महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । मुंबईसह राज्यात स्वाईन फ्लूने चिंता वाढवल्या आहेत. स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाचं टेन्शनही वाढलं आहे. स्वाइन फ्लूच्या (Swine Flu) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात जुलै महिन्यापर्यंत स्वाईन फ्लूचे 239 रुग्ण आढळले आहेत. तर 9 रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे.
2009 मध्ये स्वाईन फ्लू जगासमोर आला. H1N1 व्हायरस फ्लू या नावानेही तो ओळखला जातो. स्वाईन फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा श्वसन रोगाचा एक प्रकार आहे. 2009 मध्ये, या संसर्गाने जगभरातील अनेक जणांचे प्राण घेतले होते.