३९ दिवसांनंतर आज मंत्रिमंडळ विस्तार : कोणाकोणाची वर्णी लागणार ; 11 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । राज्य मंत्रिमंडळाचा 39 दिवसांपासून लांबलेला विस्तार अखेर मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवनात पार पडणार आहे. त्यात भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या यादीत काही नव्या चेहऱ्यांचा समावेश असल्याचीही चर्चा आहे. सोमवारी दिवसभर शपथ घेणाऱ्या आमदारांना फोन करून निरोप देण्यात आलेत. दरम्यान, स्वच्छ प्रतीमा असलेल्या आमदारांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

‘सह्याद्री’वर बैठकांचे सत्र

आज महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू आहे. या बैठकीत कोणाला मंत्रिपद द्यायचे हे नाव निश्चित होणार आहे. सोबतच अब्दुल सत्तार यांना मंत्री करायचे की नाही यावरही या बैठकीत सल्लामसलत होईल.

30 जून रोजी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर दोघांनीच मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन पेट्रोलवरील कर कमी करणे, शेतकऱ्यांना अनुदान यांसारखे निर्णय घेतले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नव्हता. त्यामुळे सत्ताधारी आमदारांत धाकधूक वाढली होती, तर विरोधी पक्षांचे नेतेही शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करत होते. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्लीत 6 वाऱ्या झाल्या होत्या.

तेलंगणात 68 दिवस दोघांनीच चालवले सरकार

महाराष्ट्रात 40 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत असला तरी याआधी तेलगंणमध्ये चंद्रशेखर राव यांनी आपले सहकारी व गृहमंत्री मोहमंद यांच्यासोबत 68 दिवस सरकार चालवले होते. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला.

भाजपचे संभाव्य मंत्री : चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे.

शिंदेसेनेचे संभाव्य मंत्री : गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट, उदय सामंत, दीपक केसरकर, सदा सरवणकर, शंभूराज देसाई व अपक्ष बच्चू कडू यांनाही स्थान मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *