महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । शिंदे सरकारचा नुकताच शपथविधी सोहळा पार पडला आहे. आज खातेवाटपाची बैठक होणार आहे. पण, त्याआधीच शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांची प्रकृती बिघडली आहे. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
तानाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आज पुण्याच्या दौऱ्यावर असताना अचानक सावंत यांची प्रकृती बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तानाजी सावंत यांना तातडीने पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आज खातेवाटपाची बैठक होणार आहे. त्यामुळे सावंत हे या बैठकीला गैरहजर राहणार आहे.