CNG आणि PNG च्या किंमती कमी होणार ? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । सीएनजीच्या किमतीत सातत्याने वाढ होऊन त्याचे दर पेट्रोल-डिझेलच्या दरांजवळ आहे आहेत. त्यामुळे सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लवकरच उद्योगांना मिळणारा काही नॅचरल गॅस दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि मुंबईतील महानगर गॅससारख्या सिटी गॅस ऑपरेटरना पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या किमती रोखण्यात मदत होणार आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, गॅस वितरकांना घरगुती उत्पादित गॅसचे वाटप वाढवण्यासाठी पूर्वीच्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीच्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) आणि मुंबईच्या महानगर गॅस लिमिटेड (MGL) सारख्या शहरांमधील गॅस वितरण कंपन्यांसाठी वाटप 17.5 दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वरून 2.078 दशलक्ष घनमीटर करण्यात आले आहे.

वाढीव वाटप देशातील सीएनजी, पीएनजी पुरवठ्यासाठी 94 टक्के मागणी पूर्ण करेल. आतापर्यंत सुमारे 83 टक्के मागणी या माध्यमातून पूर्ण होत होती. उर्वरित वाटप एलएनजीच्या आयातीद्वारे गेल पूर्ण करत होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गॅस वितरक कंपन्यांनी आयात केलेल्या एलएनजीच्या व्यवस्थेबद्दल तक्रार केली होती. त्यामुळे सीएनजी आणि पाइप्ड एलपीजीच्या किमती पुन्हा-पुन्हा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात 3 ऑगस्ट रोजी वाढ करण्यात आली होती. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4 रुपये प्रति एससीएम वाढ झाली होती. मुंबईत किमती वाढल्यानंतर आता सीएनजी 86 रुपये प्रति किलो आणि पीएनजी गॅस 52 रुपये 50 पैसे प्रति एससीएम दराने विकलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *