जगातील नालायक शहरांची यादी जाहीर; पाकिस्तानने नंबर लावला, पाहा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । इकोनॉमि्सट इंटेलिजेंस युनिट(EIU)ने जगातील राहण्याच्या दृष्टीने लायक (Global Liveability Index) आणि नालायक शहरांची यादी जाहीर केली आहे. जगभरातील १७२ शहरांचा अभ्यास केल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली. जाणून घेऊयात अशी कोणती १० शहर आहेत ज्याचा समावेश नालायक शहरात झालाय.

जगातील नालायक शहरांच्या यादीत पाकिस्तानमधील कराची (karachi city )ने पुन्हा एकदा स्थान मिळवले आहे. ही यादी तयार करताना पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण, संस्कृती आणि मनोरंजन या घटनांचा आधार घेतला होता. या यादीत अव्वल स्थानी इराणमधील तेहरान शहर आहे. दुसऱ्या स्थानी कॅमेरूनमधील डौआला, तिसर्या स्थानी झिम्बाब्वेमधील हरारे, चौथ्या स्थानी बांगलादेशमधील ढाका, पाचव्या स्थानी पोर्ट मोरेस्बी, सहाव्या स्थानी कराची, सातव्या स्थानी अल्जेरियामधील अल्जियर्स, लिबियामधील त्रिपोली आठव्या, नायरेजियामधील लागोस नवव्या तर सिरियामधील दमास्कस हे दहाव्या स्थानावर आहे.

EIU जाहीर केलेल्या लायक शहरांमध्ये ऑस्ट्रियातील व्हिएन्ना अव्वल स्थानी आहे. त्यानंतर डेन्मार्कमधील कोपनहेगन, स्वित्झर्लंडमधील झुरिच, कॅनडातील कॅलगरी आणि व्हॅकुव्हर यांचा अनुक्रमे दुसरा,तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो. सहाव्या स्थानावर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा, सातव्या स्थानावर जर्मनीमधील जिनिव्हाचा नंबर लागतो. कॅनडामधील टोरोंटो आठव्या, नेदरलँडमदील अम्सटरडॅम नवव्या तर दहाव्या स्थानावर जपानमधील ओसाका आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या दोन शहरांनी स्थान मिळवले आहे. लायक आणि नालायक शहरांच्या यादीत भारतातील एकही शहराचा समावेश नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *