महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडचे मालकी हक्क असलेल्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक ५ जेतेपदं जिंकून आपला दबदबा कायम राखला आहे. आता MI Family दक्षिण आफ्रिका आणि युएई येथे होणाऱ्या लीगमध्येही खेळणार आहे. UAE आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीग व क्रिकेट दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये रिलायन्सने दोन संघ खरेदी केले आहेत. ‘MI Emirates’ या नावाने यूएई आंतरराष्ट्रीय लीगमध्ये फ्रँचायझी मैदानावर उतरणार आहे, तर आफ्रिकेतील लीगमधील संघाचं नाव ‘MI Cape Town’ असे असणार आहे. आज MI Cape Town संघाने त्यांच्या ५ प्रमुख खेळाडूंची नावे जाहीर केली.
FA𝐌𝐈LY OF TEAMS! 💙 @mipaltan
📰 Read more – https://t.co/GfKn0ZhoDj #OneFamily #MIcapetown @OfficialCSA pic.twitter.com/pGxPwqWJvq
— MI Cape Town (@MICapeTown) August 10, 2022
MI Cape Town संघाने ३ परदेशी, दक्षिण आफ्रिकेचा १ कॅप्ड व आफ्रिकेच्या १ अनकॅप्ड खेळाडूला करारबद्ध केले आहे. कागिसो रबाडा, अफगाणिस्तानचा राशिद खान, इंग्लंडचा लिएम लिव्हिंगस्टोन व सॅम कुरन आणि आफ्रिकेचा अनकॅप्ड खेळाडू डेवॉल्ड ब्रेव्हिस यांना करारबद्ध केल्याची घोषणा रिलायन्सन जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी केली. ते म्हणाले,”MI Cape Town संघाच्या बांधणीला आम्ही सुरुवात केली आहे. राशिद, कागिसो, लिएम, सॅम यांचा #OneFamily संघात स्वागत करतो. डेवॉल्ड ब्रेव्हिस याही प्रवासात आमच्यासोबत असल्याचा आनंद आहे.”
चेन्नई सुपर किंग्सनेही जोहान्सबर्ग फ्रँचायजी खरेदी केली आहे आणि त्यांनी फॅफ ड्यू प्लेसिससह, इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली यालाही करारबद्ध केल्याचे वृत्त आहे. मोईन अली हा आयपीएलमध्ये चेन्नईकडूनच खेळतो आणि यूएई लीगमध्येही तो चेन्नईच्याच मालकी हक्क असलेल्या संघाचा सदस्य असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने प्रेटोरिया व सनरायझर्स हैदराबादने पोर्ट एलिझाबेथ संघाचे मालकी हक्क मिळवले आहेत. या दोन्ही संघांनी अनुक्रमे एनरीच नॉर्खिया व एडन मार्कराम यांना प्रमुख खेळाडू म्हणून करारबद्ध केले आहे. राजस्थान रॉयल्सच्या मालकी हक्क असलेल्या पार्ल फ्रँचायझीने जोस बटलरला करारबद्ध केले आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या डरबन फ्रँचायझीने क्विंटन डी कॉकशी करार केला आहे.