महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । मागच्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने मागच्या 24 तासांत उसंत दिली असली तरी पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. (Maharashtra Rain Alert) राज्यात पुढचे चार दिवस पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या 24 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील ही काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भात 13 आणि 14 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही स्थिती झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील पाऊस कमी झाला असून केवळ काही भागांतच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली होती.
11 Aug, Heavy rainfall warnings by IMD during coming 5 days in Maharashtra:
Gradual decrease in rainfall activity on day 2 & 3.
Day 4 again increase in Vidarbha region, South Konkan and S Madhya Mah.
Day 5 activity in Vidarbha likely to decrease. Other parts; similar to day 4. pic.twitter.com/WlizimNb7Q— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 11, 2022
आता मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी झाली आहे; तर सौराष्ट्र ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती आहे. मात्र त्याचा प्रभाव केवळ किनारपट्टीच्या भागात आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस कमी झाला आहे. राज्यात रायगड, रत्नागिरी, पुणे (घाटमाथा), सातारा (घाटमाथा), वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या भागांसाठी हवामान विभागाने वर्तविला आहे.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यात तर पावसाची प्रचंड बॅटिंग सुरु आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालं आहे. खडकवासाला धरणामध्ये पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून आज संध्याकाळी 26 हजार 809 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. मुसळधार पावसामुळे मुठा नदीला पूर आला. विशेष म्हणजे पूर आल्याने नदी पात्रातील भिडे पूलही पाण्याखाली गेला. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.