आमदार, खासदार, मंत्री खूप होतात पण ‘ते’ फक्त मुलांचा विचार करतात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । ‘आमदार, खासदार, मंत्री खूप होतात आणि जे होतात ते मुलाबाळांचा विचार करतात. पत्नी, मुलगा नाही तर, ड्रायव्हर किंवा चमच्यासाठी उमेदवारी मागतात. कुणी समाजाची उन्नती केल्याचे अजुन दिसत नाही. काहींनी केली असल्यास अपवाद असतील, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांचे कान टोचले.

जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आदिवासी विभागाच्यावतीने सांस्कृतिक महोत्सव व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना गडकरी यांनी चौफेर टोलेबाजी केली.

आपल्याला विकास करायचा असल्यास स्वत:च्या हाताने करा. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासातून शक्य आहे. शिक्षणाची सोय होणे आवश्यक आहे. हजारो इंजिनीअर, डॉक्टर, वकील झाल्यास समाजाची प्रगती निश्चित होईल. आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी रस्ते, वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटीत स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मरस्कोल्हे, आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, सहायक अतिरिक्त आयुक्त दशरथ कुळमेश, सहआयुक्त बबिता गिरी, जितेंद्र चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *