भाजप लबाड बोलणारा पक्ष ; जो घाबरेल त्याला घाबरवलं, जो विकला त्याला खरेदी केलं, शिंदे गटाला तेजस्वी यादवांचा जोरदार टोला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । बिहारचे (Bihar) उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी दिल्लीत अनेक बड्या नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचीही भेट घेतली आहे. तेजस्वी यादव यांनी दिल्लीत पोहोचून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपनं महाराष्ट्र , झारखंड, राज्यात प्रादेशिक पक्षाचं काय केलं बघितलं, जो घाबरेल त्याला त्याला ईडीचा धाक दाखवून घाबरवलं आणि जो खरेदी करता येईल त्याला खरेदी केलं, पण बिहारी विकला जाणारा नाही, असे म्हणत शिंदे गटालाही टोला गवाला आहे. भाजपाच्या विरोधात आम्ही बिहारमधून सुरुवात केली आहे, आता आम्ही आणि नीतीश कुमार एकत्रित आहोत, सगळ्या विरोधी पक्षांनी आता एकत्रित बसण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी विरोधी पक्षांना केलं आहे.

त्यांनी भाजपला मोठा लबाड पक्ष म्हटले. भाजपवाले फसव्या गोष्टी करण्यातच मजा घेतात. भाजपला जर बहिराची काळजी असती तर त्याला आजपर्यंत विशेष दर्जा का दिला गेला नाही, असेही त्यांनी विचारलं आहे. तर बेरोजगाराची चर्चा सर्वत्र होत आहे, मात्र या भाजपला त्याचे काही देणेघेणे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. बिहारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तेजस्वी यादव दिल्लीत पोहोचले आहेत.

भाजप राज्यात 19 लाख नोकऱ्या देण्याचे केवळे बोलत आहे मात्र त्यांनीही 19 नोकऱ्या दिल्या का? त्याचप्रमाणे ते देशात 2 कोटी नोकऱ्या देण्याचे बोलायचे मात्र ते फक्त 80 लाख नोकऱ्याही देऊ शकले. तेजस्वी यादव यांनी असा आरोपही केला की एडिट केलेला व्हिडिओ चालवला गेला, त्य व्हिडिओला त्याला उत्तर दिलं आहे. गिरीराज सिंह यांनी पंतप्रधान मोदींना नोकऱ्या आणि राज्याला दिलेल्या विशेष पॅकेजबद्दल विचारण्याचे धाडस दाखवायला हवे. भाजप हा लबाडांचा पक्ष आहे, अशी घणाघाती टीका भाजपवर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *