“शिवसेनेचा सामना आता शेलारांशी” ; मुंबईत बदल अटळ ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवडीसोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून आशिष शेलार यांची निवड करण्यात आली असून त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मुंबईत आमचाच महापौर असेल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे. दरम्यान, आता शिवसेनेचा सामना शेलारांशी आहे असं म्हणत त्यांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असून मुंबईच्या भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी शेलारांकडे आली आहे. त्यानंतर, “मुंबईतील शिवसेनेने केलेल्या भ्रष्टाचारापासून आपल्याला मुंबईच्या नागरिकांना मुक्त करायचं आहे. शिवसेना मुंबईत केलेल्या भ्रष्टाचारापासून पळ काढू शकत नाही. मला दिलेली जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने पार पाडेल.” असं आशिष शेलार बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान, आमचं ठरलंय! …मुंबईत बदल अटळ आहे, शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असून ठाकरेंची शिवसेना आता तडीपार होणार आहे, आमचा मुंबई महापालिकेतील निवडणुकीत विजय होणार आहे असा दावा शेलारांनी यावेळी बोलताना केली आहे. तर शिंदे गटाचे नवे शिवसेना भवन बनत असल्याचा आनंद वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिवसेना आमच्यासोबत संघर्ष करू शकत नाही असं म्हणत त्यांनी अरविंद सावंतावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपली खासदारकी टिकवली तरी खूप झालं. त्यांनी स्वत:च्या जिवावार निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हानही शेलारांनी दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *