‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम” संजय शिरसाट यांचा डायरेक्ट यू टर्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काल एक ट्विट केलं त्याची जोरदार चर्चा झाली. शिरसाट पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यावर आता संजय शिरसाट यांनीच आपली प्रतिक्रिया देत पडदा टाकलाय. “मी एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. का झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं”, असं संजय शिरकाट म्हणालेत. शिवाय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमचे कुटुंब प्रमुख होते आता नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

संजय शिरसाठ यांनी आपल्या ट्विट मधून उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केलेला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतलं एक भाषण ही त्यांनी त्या ट्विटला जोडलेलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे दिलेलं वचन आम्ही पाळतोच आणि दिलेला शब्द हा खरा करून दाखवतोच, असे म्हणताना दिसत आहेत. तर संजय शिरसाट यांची अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेली नाहीये. त्यामुळे संजय शिरसाठ यांना मंत्रिपदाचे वचन मिळालं होतं का? आणि ते वचन पूर्ण झालं नाही, म्हणून शिरसाठ यांचे हे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित करणार हे ट्विट आहे. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीटही केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *