“प्रति सेनाभवन नव्हे तर ….. ”, उदय सामंतांचं स्पष्टीकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेची ओळख असलेल्या धनुष्यबाणावर दावा केल्यानंतर आता दादरमध्ये प्रतिशिवसेना भवन बांधणार असल्याची चर्चा होत आहे. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कासाठी कार्यालय बांधतोय, शिवसेना भवनाबद्दल (Shivsena Bhavan) आदर कायम आहे”, असं उदय सामंत म्हणाले आहेत. “मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत, हा गैरसमज पसरवला जात आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवनबद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील”, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आता शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, आणि शिवसेना भवन कुणाचं? असा प्रश्न विचारला जातोय. त्याचवेळी शिंदे गट मुंबईत प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात जोरात सुरु आहे. त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयासाठी शिंदे गटाकडून दादरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी जागेचा शोध सुरु असल्याची माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिलीय. त्यामुळे शिंदेगट दादरमध्ये प्रतिशिवसेना भवन बांधणार असल्याची चर्चा होती त्यावर आता उदय सामंतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *