महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा घात कि अपघात यावर अनेक चर्चा होत आहेत. यात मात्र आता त्यांचे भाचे आणि पुतण्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारचे नवीन आरोप केले आहेत. विनायक मेटे यांचा एक्स्प्रेस वेवर अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला . या प्रकरणाची सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी अपघातावरुन ड्रायव्हरवर आरोप केले आहे. हा घातपात का अपघात हे निष्पन्न झाले नाही. ड्रायव्हर रोज आपलं स्टेटमेंट बदलत आहे. त्यामुळे आम्हाला शंका येत आहे. निधनाच्या दुःखातून सावरलो नाही मात्र 3 दिवसानंतर आम्ही मीडिया समोर यायचं ठरवल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
अपघात झाल्यानंतर मला फोन आले. मेटे यांचे 3 ड्रायव्हर आहेत. सुरुवातीला मला माहित नव्हतं कोण ड्रायव्हर आहेत. एकनाथ कदम हा ड्रायव्हर आहे असे कळलं तर मी त्याला मी फोन केला. मी त्याला त्यांचं लोकेशन विचारलं. रोज फिरणारा ड्रायव्हर तुम्ही कोण बोलत आहे, असं मला विचारात होता. मी त्याला लोकेशन सांग असे सातत्याने विचारत होतो पण तो नुसता रडत होता. एका तिऱ्हाईक व्यक्तीला त्याने फोन दिला आणि त्यांनी मला सांगितले की तिथे अँब्युलन्स आली आहे, असा प्रकार घडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सर्व चुकी ड्रायव्हर एकनाथ कदम यांची आहे. सीसीटिव्हीमध्ये आम्हाला कुठेच दिसला नाही. हा ड्रायव्हर सतत कोणाला फोन करत होता. ड्रायव्हरचा संपर्क कोणाशी होता त्याचे कॉल डिटेल्स हवेत, असे खळबळजनक आरोप देखील त्यांच्या भाच्याने केले आहे.
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला गुजरातमधील दमन या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. हा ट्रक पालघरमधील असून ट्रक मालकाने ट्रक चालकाची ओळख पटवली आहे. या अपघाताचा तपास करण्यासाठी रायगड पोलिसांनी सहा टीम तयार केल्या होत्या. त्यानंतर या अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ट्रकची ओळख पटली होती.