महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट ।
दिनांक 18 19 आणि 20 ऑगस्ट
18 ऑगस्टला दिवसभर सर्वांसाठी दर्शन खुले
19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता श्री राधाकृष्ण यांचा अभिषेक, नैवेद्य आणि रात्री बारा वाजता महाआरती.
20 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये इस्कॉन चे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांची 126 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) या संस्थेचे संस्थापक आचार्य कृष्णकृपा श्रीमूर्ती अभयचरणारविंद भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या 126व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्राचा थोडा परिचय. 17 सप्टेंबर 1965 रोजी कृष्णकृपाश्री मूर्ती अभयचरणारविंद भक्तीवेदांत स्वामी न्यूयॉर्कच्या बंदरावर पोहोचले.त्यांच्या आगमनाची दखल फारच थोड्या अमेरिकन लोकांनी घेतली, परंतु प्रभुपाद इतर परदेशी प्रवाशाप्रमाणे नव्हते. अमेरिकेतील लोकांना भारतातील वैदिक ज्ञान शिकवण्यासाठी श्रील प्रभुपाद अमेरिकेत गेले पाशात्य देशातील लोकांना प्राचीन वैदिक संस्कृतीचे तत्त्वज्ञान समजून सांगण्याची फार मोठी कामगिरी श्रील प्रभुपाद यांनी स्वीकारली. वयाच्या 81 व्या वर्षी 1977 साली ज्यावेळी श्रील प्रभुपाद यानी या जगाचा निरोप घेतला त्यावेळी त्यांनी त्यांची कामगिरी मोठ्या यशस्वीपणे पार पाडली .त्यांनी इस्कॉन या संस्थेची स्थापना केली, हरेकृष्ण आंदोलन त्यांनी संपूर्ण जगभर पसरवले कृष्ण भक्तीचा प्रचार करून त्यांनी जगभरात शंभरापेक्षा अधिक मंदिरांची उभारणी केली आणि आश्रम व सांस्कृतिक शिक्षण केंद्र उभारली.