महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यावर मंदिरं सुरू झाली मात्र आजही शिर्डीच्या साई मंदिरात हार आणि फुलं नेण्यास घातलेली बंदी अजूनही कायम आहे. फुलं-हारांमुळे भाविकांची लुट होते तसेच मंदिरात अस्वच्छता निर्माण होते असा दावा करत विश्वस्त मंडळाने फुलं-हार बंदीचा निर्णय कायम ठेवलाय. दरम्यान या निर्णयाला शिर्डीतून फुलं विक्रेते, फुल उत्पादक शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होतोय. ऑक्टोबर २०२१पासून फुलं-हारांवर बंदी घातल्याने कोट्यवधींचं नुकसान झालंय.