’15 सप्टेंबरला मंत्रिमंडळ विस्तार! मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलाय’ बच्चू कडू म्हणतात, मी नाराज नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी आणि झाल्यानंतरही प्रहार संघटेने अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नाराजीचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना आपला मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) समावेश होईलच, असा विश्वास व्यक्त केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी आपल्याला शब्द दिला आहे, असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहेत. तसंच मी नाराज नाही, असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे 15 सप्टेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडण्याचे सुतोवाचही त्यांनी दिले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या कामकाजाआधी विधान भवनात पोहोचलेले बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीसोबत एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, त्यावरुन असलेली आमदारांची नाराजी आणि गाजलेलं फोन टॅपिंग प्रकरणा यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *