महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । काल राज्यभरात गोपाळकाल्यानिमित्त दहिहंडी उत्सव आनंदात साजरा पडला. यामध्ये अनेक गोविंदा पथकाने दहिहंडी फोडण्याचा विक्रम केला असून या खेळात राज्यभरातील गोविंदा पथकातले जवळपास १५३ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील १३० जणांवर उपचार होऊन त्यांनी रूग्णालयातून सुटका मिळाली आहे.
जखमी झालेल्या गोविंदांपैकी ठाणे जिल्ह्यातील सर्वांत जास्त ६४ गोविंदा जखमी झाले असल्याची माहिती ठाण्याच्या महापालिकेने दिली आहे. जखमी झालेल्या सर्व गोविंदांपैकी २३ गोविंदा जबर जखमी झाले असून त्यांच्यावर अजून उपचार सुरू असल्याची माहिती आहे.