महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत असल्याची कबुलीच भाजपने दिली आहे, असा ‘ठाकरी’ टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लगावला. मोदी पर्व संपल्याची ही नांदीच असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई भाजपच्या षण्मुखानंद सभागृहातील मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईसाठी जे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच फडणवीस यांनी एक प्रकारे अधोरेखित केले आहे, असा घणाघात करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे.
फडणवीस काय म्हणाले…
मुंबईसाठी जे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. मुंबईकरांसाठी काम करणाऱयांना निवडून आणायचे आहे.