महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । आशिया कप (Asia cup) स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होत आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेश मध्ये पहिला टी 20 सामना होणार आहे. भारतीय संघ 28 ऑगस्टला पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत जबरदस्त क्रिकेट पहायला मिळेल, कारण टी 20 चा फॉर्मेट आहे. क्रिकेटच्या या फॉर्मेट (Cricket Format) मध्ये कुठलाही संघ जिंकू शकतो. आशिया कप मध्ये भारताबद्दल बोलायच झाल्यास फलंदाजी दमदार आहे. या स्पर्धेत भारताने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. आशिया कप मध्ये भारताचा सर्वात मोठा ‘रन’वीर कोण आहे, ते जाणून घेऊया. आशिया कप स्पर्धेत खेळताना भारताकडून विद्यमान संघातील रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आशिया कपचे 27 सामने खेळला आहे. त्याने 42 पेक्षा जास्त सरासरीने 883 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने एका शतक आणि सात अर्धशतक झळकावली आहेत.
दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर कोण?
दुसऱ्या नंबरवर दिग्गज फलंदाज विराट कोहली आहे. कोहलीने आशिया कप स्पर्धेत खेळताना 16 सामन्यात 63 च्या सरासरीने सर्वाधिक 766 धावा केल्या आहेत. विराटन पाकिस्तान विरुद्ध 183 धावांची इनिंग खेळला होता. ही त्याच्या वनडे करीयरमधील बेस्ट इनिंग आहे. विद्यमान संघातील दिनेश कार्तिक आशिया कप मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या नंबरवर आहे. कार्तिकने आशिया कपच्या 12 सामन्यात 43 पेक्षा जास्त सरासरीने 302 धावा केल्या आहेत. यात एक अर्धशतक आहे.
सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा
आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने या स्पर्धेत खेळताना 2 शतकं आणि 7 अर्धशतक झळकावली आहेत. त्याने एकूण 971 धावा फटकावल्या आहेत. रोहित शर्मा आता सचिनपासून जास्त लांब नाहीय. आशिया कप मध्ये रोहित सचिनला मागे टाकू शकतो.