महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या जे मनात असते ते बोलून रिकामे होतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले असते.(Nitin Gadkari) नितीन गडकरी पुन्हा आपल्या बोलण्याच्या शैलीने चर्चेत आले आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी भाजपने केंद्रीय संसदीय मंडळाची घोषणा केली. यामध्ये संसदीय मंडळामधून नितीन गडकरी यांचे नाव वगळण्यात आले. याची राजकीय वर्तृळात जोरदार चर्चा झाली या अनुशंगाने नितीन गडकरी यांनी वक्तव्य केल्याची जोरदार रंगली आहे.
ते म्हणाले कि, कोणाचा वापर करून त्या व्यक्तीला कधीच फेकून देऊ नका असे म्हणत त्यांनी सगळ्यांचाच समाचार घेतला. ते नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, कोणाचा वापर करून त्याला गरज संपल्यानंतर फेकून देणे चूक आहे.
चागंले दिवस असो अथवा वाईट दिवस तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा हाथ पकडला तर तो कधीच सोडू नका. फक्त उगवत्या सुर्याचीच नाही तर जो सूर्य मावळतो आहे त्याची देखील पूजा करणे आवश्यक असते. गडकरी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ते नागपुरात आयोजित उद्योजकांच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उद्योजकांशी संवाद साधताना गडकरी यांनी रिचर्ड निक्सनचे उदाहारण देत म्हटले की, एखादी व्यक्ती तेव्हा संपत नाही जेव्हा तो हारतो. व्यक्ती तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणे सोडून देतो. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीही सोडू नका. व्यवसाय, समाजसेवा आणि राजकारण या क्षेत्रात जनसंपर्क हीच त्या व्यक्तीची खरी ताकद असते. त्यामुळे जनसंपर्क वाढता कसा राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी आपला जुना एक किस्सा देखील सांगितला. गडकरी म्हणाले जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी मला चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मी एकवेळी विहीरीत उडी मारेल पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही.