महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । प्रगतीच्या दृष्टीने राज्य सरकारचे काम अतिशय उत्तम सुरू आहे. भाजपचे ‘मिशन बारामती’ नव्हे तर ‘मिशन महाराष्ट्र’ असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले. अखिल भारतीय महानुभाव संमेलनानिमित्त मंगळवारी (दि. 30) ते नाशिक दाैऱ्यावर हाेते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी भाजपचे ‘मिशन बारामती’ सुरू आहे का असा प्रश्न विचारला यावर फडणवीस म्हणाले की, बारामती नाही तर भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’सुरू आहे.
‘राज’भेटीबाबत मौन : भाजपचे नेते राज ठाकरे यांची भेट घेत असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यावर फडणवीस यांनी भाष्य करायचे टाळले. याेगगुरू रामदेव बाबा यांनी नुकतीच फडणवीस यांची भेट घेतली याबाबत ते म्हणाले ती सदिच्छा भेट होती.