शिवतीर्थावर गणरायाची प्रतिष्ठपणा ; एकाच फ्रेममध्ये लेक-सून आणि नातू आणि आजोबा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ऑगस्ट । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थ या नव्या निवास्थानी राहण्यास गेले. नव्या घरी राहण्यास गेल्यानंतर नव्या पाहुण्याचे आगमन झाले. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे आणि स्नुषा मिताली ठाकरे हे आई-बाबा झाले. आज शिवतीर्थावर गणरायाची प्रतिष्ठपणा झाली. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक हजर होते.

संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धूमधाम आहे. कोरोना संकटाच्या २ वर्षानंतर गणरायाचं आगमन होत असल्याने यावर्षी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरात पहिल्यांदाच बाप्पाचं आगमन होतंय, त्यामुळे ठाकरे परिवारामध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. राज ठाकरे यावर्षी आजोबाही बनले आहेत. त्यामुळे हा आनंद आणखीनच द्विगुणित झालाय. आज सकाळी साडे दहा वाजता राज यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी लाडका नातू कियानचा उत्साह पाहून राज ठाकरेंना त्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या आणि विघहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायांचा उत्सव आज, बुधवारपासून सुरू होत आहे. करोना संकटाच्या दोन वर्षांनंतर यंदा जल्लोषात आणि उत्साहाने उत्सव साजरा होणार असल्याने मुंबईसह राज्यभरातील भक्त गणरंगात न्हाऊन निघाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये विविध ठिकाणी बाप्पांचं आगमन होतंय.

राज ठाकरे नुकतेच शिवतीर्थ निवासस्थानी राहायला गेलेत. नवीन वास्तूत गणपती बाप्पांचं पहिल्यांदा आगमन झालंय. त्यांच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली गेली आहे. यंदाच्या वर्षीच ठाकरे कुटुंबात नातवाचं आगमन झालंय. अमित-मिताली यांना ५ एप्रिल रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. कियान असं त्यांनी आपलं मुलाचं नाव ठेवलंय. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबात बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळाली. राज ठाकरे-शर्मिला ठाकरे, अमित-मिताली ठाकरे यांच्या घरी सकाळीच गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाली. यानंतर अनौपचारिक फोटोसेशन पार पडलं. यावेळी नातवंडाच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य पाहून राज ठाकरेंना त्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. आईच्या कुशीत असलेल्या कियानचे राज ठाकरे यांनी काही फोटो काढले. यावेळी त्यांनी एकाच फ्रेममध्ये लेक-सून आणि नातू यांचा फोटो टिपला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *