महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ऑगस्ट । बरेचसे क्रिकेट खेळाडू भारतीय देशाचे चाहते आहेत. भारतीय संस्कृती, सणवार, परंपरा या परदेशी खेळाडूंना फार आवडतात. आयपीएलच्या आणि क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने या खेळाडूंना भारताला जवळून पाहता येते. तर असाच एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे जो भारताचा खूप मोठा चाहता आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा भारताचा मोठा चाहता आहे. भारतातील सण समारंभ असो किंवा सिनेमाबाबतच्या काही घडामोडी वॉर्नर कायमच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो पोस्ट करत भारतीय चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोवर थोड्याच कालावधीत अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत.
https://www.instagram.com/davidwarner31/?utm_source=ig_embed&ig_rid=c1f81a25-15f1-4a81-8968-77f9c69acf4b
डेव्हिड वॉर्नर भारतात फार प्रसिद्ध आहे. भारतातील लोकप्रिय आयपीएल लीगमध्ये बराच काळ त्याने सनरायजर्स हैदराबाद या संघाचे नेतृत्त्व केले. आयपीएलच्या मागच्या हंगामात दिल्लीच्या संघाने त्याला आपल्या संघात घेतले. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे त्याने सर्वांची मने जिंकली आहेतच, पण त्याच्या या इंस्टाग्राम पोस्टमुळे सगळे त्याची वाहवा करत आहेत.
वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या पिवळ्या जर्सीमध्ये हात जोडून उभा आहे आणि त्याच्या मागील बाजूस गणपतीचा एक सुंदर एडिट केलेला फोटो आहे. त्या फोटोसाठी त्याने खाली कॅप्शन मध्ये लिहिले आहे, “माझ्या सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या आनंदमय शुभेच्छा!”