कोरोनाचे थैमान ; ‘या’ देशात लॉकडाऊन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ऑगस्ट । भारतात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी झालाय. मात्र, धोका अद्याप कायम संपलेला नाही. आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus Update) डोकेवर काढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चीनच्या अनेक मोठ्या शहरांनी मंगळवारी कडक कोविड-19 निर्बंध लावण्यात आले आहे. (COVID-19 restrictions) शेन्झेन (Shenzhen)या शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांना घरात राहावे लागले आहे.

कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला धोका पोहोचला आहे. आता आरोग्यासाठी नवीन चिंता निर्माण झाली आहे. शेन्झेनच्या दक्षिणेकडील टेक हबपासून नैऋत्य चेंगदूपर्यंत आणि डॅलियनच्या ईशान्य बंदरापर्यंतच्या शहरांत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळते आहे. मोठ्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावला असून अनेक ठिकाणी व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली असून शेन्झेनने अधिक व्यवसाय बंद केले आहे. तर काही ठिकाणी शाळा बंद करण्यात आल्या आहे. शाळा वर्षाची सुरुवात पुढे ढकलली. दरम्यान, चीनने कोविड झिरो धोरण राबविले आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्याने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत.

बीजिंग आणि शांघाय या दोन सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांना अलीकडेपर्यंत कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत. दरम्यान, मंगळवारी, 2.5 कोटी लोकसंख्या असलेल्या लाँगहुआच्या शेन्झेन जिल्ह्यात मनोरंजन स्थळे आणि घाऊक बाजार बंद केले आणि मोठ्या कार्यक्रमांना बंदी घातलण्यात आली आहे.

लाँगहुआ जिल्हा अधिकार्‍यांनी सांगितले की, निवासी आवारात प्रवेश करण्यासाठी लोकांनी 24 तासांच्या आत कोरोना निगेटिव्ह चाचणी आवश्यक पाहिजे आणि रेस्टॉरंट्सने 50 टक्के उपस्थितीचेने निर्बंध मर्यादित आहे. हे नवीन निर्बंध शनिवारपर्यंत राहतील. यावर्षी ओमयक्रॉनच्या उद्रेकाशी लढा देणार्‍या शेन्झेनमधील 6 कोटीहून अधिक प्रभावित झालेल्या इतर तीन जिल्ह्यांचा समावेश करुन सोमवारी कोरोना निर्बंधाबाबत उपाययोजना केल्या.

सोमवारी, तिबेट, किंघाई आणि सिचुआन प्रांत, किंघाईची राजधानी असलेल्या झिनिंगने सोमवार ते गुरुवार सकाळपर्यंत सार्वजनिक वाहतूक थांबविण्याचे आणि प्रमुख शहरी भागातील हालचाली मर्यादित करण्याचे आदेश दिले. हाँगकाँगमध्ये प्रकरणे वाढत आहेत. सरकारी माहितीनुसार आठवड्यात दररोज 10,000 संसर्ग होण्याची अपेक्षा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *