Asia Cup 2022 ; ऋषभ पंतला का वगळलं? रविंद्र जडेजा पत्रकारांना म्हणाला…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ऑगस्ट । आशिया कप 2022 स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना भारताने 5 गडी आणि 2 चेंडू राखून जिंकला. असं असलं तरी या सामन्यात आक्रमक शैली असलेला विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याला का वगळलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज भारताचा दुसरा सामना हाँगकाँगविरुद्ध होणार आहे. त्यामुळे या सामन्यात ऋषभ पंतला स्थान मिळेल का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. त्यात सामन्यापूर्वी रविंद्र जडेजानं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. तसेच पंतला संघाच्या नियोजनामुळे की दुखापतीमुळे वगळलं? असा प्रश्न विचारला. त्यावर अष्टपैलू रविंद्र जडेजाने आपल्या शैलीत उत्तर दिलं.

“मला याबाबत काहीच माहिती नाही. हा प्रश्न माझ्या चाकोरीबाहेरचा आहे.”, असं हसत उत्तर रविंद्र जडेजाने दिलं.

पहिल्या सामन्यात पंतला वगळलं
पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने प्लेईंग इलेव्हनमधून ऋषभ पंतला वगळलं होतं. रोहितच्या या निर्णयावर आता भारतीय क्रिकेट वर्तुळात जोरदार टीका केली गेली. विकेटकिपर म्हणून टीम इंडियात ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली होती.

स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना आज नवख्या हाँगकाँगशी होणार आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास ते सुपर फोरसाठी पात्र ठरणार आहे . त्यामुळे टीम इंडियाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, रवींद्र जडेजा, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *