CIDCO Lottery 2022 : आर्थिकदृष्ट्या दुर्बल नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, आजपासून करा ऑनलाईन अर्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । CIDCO Lottery 2022 : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोची 4 हजार 158 घरं आणि 245 गाळे, तसेच 6 कार्यालयांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ( (cidco release advertisement) त्यासाठी ऑनलाईन अर्ज आजपासून करता येणार आहे. नवी मुंबईत द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघरमध्ये ही घरे आहेत. या 4 हजार 158 घरांपैकी 404 घरं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता असणार आहेत.

मुंबईत घर घेणे आता सर्वसामांन्याच्या आवाक्या बाहेर गेले आहे. त्यामुळे सर्वसामांन्याचा कल हा मुंबईनजीकच्या भागात घर घेण्याकडे असल्याचे दिसून येते आहे. आपलं हक्काचं घर घेण्याच्या विचारात आणि तयारीत असलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. सिडकोने मेगालॉटरी (Cidco Lottery 2022) काढणार आहे. त्यासाठीची ऑनलाईन अर्ज आजपासून तुम्हाला करता येणार आहे. (cidco release advertisement for 4 thousand 158 house lottery )

सिडकोची सदनिका तसेच व्यावसायिक गाळे, भूखंडची मेगा लॉटरी आहे. सिडकोने ऑनलाईन जाहीरात प्रसिद्ध केली आहे. तर ग्राहकांना आजपासून अर्ज करता येणार आहे. एकूण 4 हजार 158 घरांसाठी, 245 दुकाने आणि 6 व्यावसायिक भूखंडाची ही लॉटरी असणार आहे.

या ठिकाणी सिडकोची घरे
नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोड इथे ही घरं आहेत. परवडणाऱ्या दरातील या 4 हजार 158 घरांपैकी 404 घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता आणि उर्वरित 3 हजार 754 घरं ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.

या योजनांच्या सविस्तर माहितीकरिता https://www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अर्ज नोंदणीपासून ते सोडतीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पार पडणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *