महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात मान्सूनच्या (Monsoon) पावसाचे सत्र सुरु आहे. याचदरम्यान हवामान खात्याने (IMD) पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD च्या अंदाजानुसार, पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील 5 दिवस वायव्य भारत आणि मध्य भारताच्या मोठ्या भागात पावसाची संततधार वर्तवण्यात आली आहे. (IMD Weather Forecast Today Rainfall Alert)
शनिवार, 3 सप्टेंबरपासून पुढील काही दिवस उत्तर कर्नाटकात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, उत्तराखंडमध्ये सामान्य पावसाचा इशारा देण्यात आला असून, रविवार, 4 सप्टेंबर रोजी या डोंगराळ राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, केरळ, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर आपण ईशान्य हवामानाच्या बातम्यांबद्दल बोललो तर, यावेळी आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
4 सप्टेंबरपासून म्हणजेच रविवारपासून दिल्लीचे हवामान बदलू शकते, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय राजधानीत सलग तीन दिवस हलक्या पावसाची अपेक्षा आहे. पुढील २४ तासांत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
उत्तराखंडमध्ये संततधार पावसामुळे ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. चमोलीत काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील वाराणसी, गाझीपूर आणि बलिया येथे मुसळधार पावसामुळे लोकांचे हाल झाले आहेत.