महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । देशाची पहिली स्वदेशी बनावटीची युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ नौदलात दाखल झाली. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब म्हणजे या युद्धनौकेचे पहिले कमांडिंग ऑफिसर होण्याचा मान मराठमोळे ऑफिसर कमोडोर विद्याधर हारके यांना मिळाला आहे.
मूळचे नगरमधील भिंगारचे रहिवासी असलेले हारके हे ‘आयएनएस विक्रांत’ची धुरा हाती घेण्यापूर्वी कमोडोर ईस्टर्न फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर होते. इतर अनेक मोठय़ा युद्धनौकांचे नेतृत्व कमोडोर हारके यांनी केलेले आहे. ‘विक्रांत’मुळे हिंदुस्थान कोणत्याही आव्हानाचा मुकाबला आपले नौदल करू शकेल, असा विश्वास कमोडोर हारके यांनी व्यक्त केला.