लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । Petrol- Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $ 93 च्या आसपास ट्रेंड करत आहे. मात्र आजही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने शेवटच्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

एक आठवड्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर जात होते. 31 ऑगस्टपर्यंत ब्रेंट क्रूडची किंमत $104.43 होती. पण गेल्या 3 दिवसात ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती सुमारे 11 डॉलरने घसरली आहेत. आता ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $ 93.39 वर आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय?

– मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
– दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
– कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *