महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ सप्टेंबर । आशिया कप सुरू असताना क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. वन डे क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला आहे. ऑस्ट्रेलियाची टीम सर्वोत्तम मानली जाते. या खेळाडूंना कडवी टक्कर देऊन झिम्बाब्वेनं मोठा विजय मिळवला. क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे.
झिम्बाब्वेने वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया टीमला 3 विकेट्सने पराभूत करुन विजय मिळवला. या विजयाचा आनंद आपार होता. कारण झिम्बाब्वे टीमला तिसऱ्यांना एवढा मोठा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया टीमने पहिल्यांचा फलंदाजी करून 141 धावा केला. लक्ष्याचा पाठलाग करत झिम्बाब्वेने 7 गडी गमावले.
झिम्बाब्वेच्या बॉलर्सनी जबरदस्त कामगिरी केली आहे. तुफान बॅटिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खेळाडूंना एकामागे एक करत तंबुत धाडलं आणि 141 वर डाव रोखला. ब्रॅड इवांस 2, विक्टरने 1 आणि रयान बर्लीने 5 विकेट्स काढण्याचा विक्रम केला. चकाब्वाने सर्वाधिक धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया टीममध्ये वॉर्नरचं 6 धावांनी शतक हुकलं. त्याने 96 बॉलमध्ये 94 धावा केल्या. मॅक्सवेलने 22 बॉलमध्ये 19 धावा केल्या. तर एरोन फिंचने 11 बॉलमध्ये 5 धावा केल्या. बॉलर्समध्ये हेजलवूडला 3 विकेट्स घेण्यात यश आलं आहे. तर स्टोइनिस आणि अगरला प्रत्येकी एक विकेट काढण्यात यश आलं.
1983 च्या वर्ल्ड कपपासून या दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध 32 सामने खेळले आहेत. त्यापैकी 29 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. एका सामन्या टाय झाला. तर यापूर्वी दोन सामने झिम्बाब्वे संघाने जिंकले होते. 2014 मध्ये देखील त्यांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या वन डे सामन्यात 3 विकेट्सनं पराभव केला आहे.