Pitch Report : आज भारत-पाकिस्तान आमने सामने, कशी असेल मैदानाची स्थिती आणि वातावरण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । भारत आणि पाकिस्तान(India vs Pakistan) या आज पार पडणाऱ्या आशिया कपमधील (Asia Cup 2022) सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण भारताने पाकिस्तानला (IND vs PAK) ग्रुप स्टेजमध्ये मात दिली असून त्यानंतर हाँगकाँगवरही दमदार विजय मिळवला. त्यानंतर आजचा सामनाही पहिला आणि दुसरा सामना झालेल्या दुबई आंतरराष्ट्रीय मैदानातच (Dubai International Stadium) होणार असल्याने भारतीय संघाची जिंकण्याची शक्यता अधिक आहे. पण या मैदानात पाकिस्ताननेही भारतासा मात दिली आहे. तर या सामन्यात मैदानाची स्थिती तसंच सामना होणाऱ्या ठिकाणचं हवामान कसं असेल, ते पाहूया…

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे संघ 10 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये आमने-सामने आलेले आहेत. यावेळी भारताचं पारडं बहुतांश वेळा पाकिस्तानवर जड राहिलं आहे. भारताने एकूण 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून पाकिस्तान केवळ 2 सामने जिंकण्यात यशस्वी राहिलं आहे. यंदाच्या आशिया कप 2022 स्पर्धेतही दोघे ग्रुप स्टेजच्या सामन्यात आमने-सामने आलेले असताना भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला होता.

हवामानाची स्थिती कशी?
सामना होणाऱ्या मैदानातील हवामानाबद्दलच्या समोर येणाऱ्या माहितीनुसार दुबई आंतरराष्ट्रीय मैदानातील वातावरण साफ असणार आहे. दुबईत उष्ण वातावरण असल्याने याठिकाणीही ही उष्णता दिसून येईल. ज्यामुळे वातावरण 35 अंश सेल्सियस असणार आहे. तर वातावरणात 45 टक्के इतकी आर्द्रता असणार आहे. वारा देखील 16 km/hr च्या वेगाने वाहताना दिसेल.

कसे असू शकतात दोन्ही संघ?

संभाव्य भारतीय 11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.

संभाव्य पाकिस्तान 11

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *