महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । पावसाळी अधिवेशनात हिंदू तरुणींच्या धर्मांतराचा मुद्दा उपस्थित करणारे भाजपा आमदार नितेश राणे यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रातील काही विवाहसंस्था मोठ्या प्रमाणात हिंदू मुलींचं धर्मातर करण्यासाठी प्रोत्साहन आणि समर्थन देत असल्याचा दावा नितेश राणे यांनी ट्वीटमधून केला आहे. याआधी नितेश राणे यांनी हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात असून, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा आरोप केला होता. अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडत, अत्याचार करण्यात आल्यानंतर त्यांनी हे आरोप केले होते.
Some Marriage bureaus in Maharshtra r encouraging n supporting Conversion of Hindu girls in a big way..
Fake Marriage certificates r given for mere Rs 2000 in these bureaus..
Such marriage bureaus shud be shut n people running shud be arrested..
Will ensure this is done!— nitesh rane (@NiteshNRane) September 4, 2022
“महाराष्ट्रातील काही विवाहसंस्था मोठ्या प्रमाणात हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहन आणि समर्थन देत आहेत. या विवाहसंस्थामध्ये फक्त २००० रुपयांमध्ये खोटी विवाह प्रमाणपत्रं दिली जात आहेत. अशा विवाहसंस्था बंद करुन, या लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे होईल याची आपण खात्री करु,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.