स्पा पार्लरच्या नावाखाली आत सुरु होतं भलतंच, पोलिसांनी छापा टाकताच…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । पुण्यातल्या नांदेड सिटी या रेसिडेंशियल टाऊनशीपमध्ये चालत असणाऱ्या वेश्या व्यवसायावर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला आहे. नांदेड सिटीतील डेस्टिनेशन मॉलमधील ब्ल्यू बेरी स्पा अँड मसाज पार्लरवर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली आहे. यातून पोलिसांनी एका मलेशिया आणि दोन स्थानिक तरुणींची सुटका केली आहे. तर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मसाज सेंटर मालक मुंजा रामदास शिंदे (वय ३१), योगेश पवार (रा. नांदेड गाव) व्यवस्थापक अथर्व प्रशांत उभे (वय १९) आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुंजा शिंदे, अथर्व उभे आणि महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड सिटी येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना समजली होती. त्यानुसार, सापळा रचत पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर पथक सिंहगड रोड नांदेड सिटी मेन त्या ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठविले.

येथे मसाजच्या नावाखाली एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी मसाज सेंटर चालविणारा एक मालक, दोघे मॅनेजर तसेच एक परदेशी आणि दोन स्थानिक पिडीत तरुणी आढळल्या. वाहतूक प्रतिबंध कायदयान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मसाज सेंटर येथे मिळून आलेल्या पिडीत ३ तरुणींना महिला सुधार गृह येथे पाठविण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *