ठाकरे आता किरीट सोमय्यांच्या रडारवर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली चौकशीची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ सप्टेंबर । मढ मार्वेच्या 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी (1000 crore studio scam of Madh Marve) काँग्रेसचे नेते अस्लम शेख (aslam shaikh) अडचणीत सापडले आहे. आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackery) यांच्यावरही निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेचीही चौकशी करा, अशी मागणी सोमय्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मढ मार्वेच्या 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

1000 कोटींच्या मढ स्टुडिओ घोटाळ्याची चौकशी ताबडतोब सुरू करावी, MVA सरकारचे पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा भूमिकेची चौकशी करावी आणि घोटाळ्यात गुंतलेले पर्यावरण आणि BMC अधिकारी यांचे निलंबन/ट्रान्स्फर करावे अशी मागणी, किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि सोमय्या वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *