महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । देशभरात घरगुती सिलेंडरच्या किमती हजारांच्या पलिकडे गेल्या आहे. त्यामुळे सिलेंडरच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. तुम्हीही दर महिन्याला गॅस सिलेंडर घेत असाल आणि गॅसच्या वाढत्या किमतीमुळे हैराण असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. ओएनजीसी आणि रिलायन्ससारख्या प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या गॅसच्या किंमती निश्चित करण्याच्या सूत्राचा आढावा घेण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाने एक आदेश जारी करून नियोजन आयोगाचे माजी सदस्य किरीट एस पारीख यांच्या नेतृत्वाखाली ही पुनरावलोकन समिती स्थापन केली आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
सरकारने स्थापन केलेली ही समिती ग्राहकांना गॅसच्या वाजवी दराबाबत सूचना देणार आहे. शहरातील गॅस वितरण, सार्वजनिक गॅस कंपनी गेल इंडिया लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि खत मंत्रालयाशी संबंधित खाजगी कंपन्या प्रत्येकी एक प्रतिनिधी देखील या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. 2014 मध्ये, सरकारने देशांतर्गत उत्पादित गॅसची किंमत निर्धारित करण्यासाठी एक सूत्र शोधण्यासाठी गॅस वापरणाऱ्या देशांच्या गॅसच्या किमती वापरल्या.