जेव्हा मुख्यमंत्री नागरिकांनाच विचारतात जाहीर प्रश्न ; यंदाचा गणेशोत्सव जोरदार आहे ना?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ८ सप्टेंबर । या वर्षीचा गणेशोत्सव जोरदार आहे ना?’ अशी गणेशभक्तांना जाहीर विचारणा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात गणेशभक्त मोकळ्या मनाने मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा करत असल्याचे सांगितले. पुणे भेटीदरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपतीच्या मांडवात शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान लाभू दे, ईडापीडा टळू दे, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले.

मुख्यमंत्री शिंदे नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन तास उशिराने पुण्यात गणपती मंडळांच्या भेटीसाठी आले. पावसाच्या सरी कोसळत असतानाच शिंदे यांच्या वाहनांचा ताफा मध्यवस्तीत गणपती मंडळांना भेटी देत होता. मध्यवस्तीतील रस्ते पोलिसांनी बंद केल्याने त्याचा फटका स्थानिक नागरिकांसह गणेशभक्तांनाही बसला. मुख्यमंत्र्यांनी कसबा गणपतीची आरती केली. त्यानंतर त्वष्टा कासार समाज संस्था गणेश मंडळ, बुधवार पेठ येथील अशोक मंडळ ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणेशोत्सव मंडळ, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा, सदाशिव पेठ येथील छत्रपती राजाराम मंडळ, नवी पेठ येथील यशवंतनगर गणेशोत्सव मंडळ; तसेच कोथरूड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या गणेश मंडळाला त्यांनी आवर्जून दिलेली भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *