पुण्यातील धक्कादायक घटना ; नग्नावस्थेत घरात घुसला माथेफिरू ; युवतीचा विनयभंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । वडिलांना धमकवत घरात घुसून युवतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न एका माथेफिरूनं केला. धक्कादायक प्रकार म्हणजे हा व्यक्ती नग्नावस्थेत होता. त्याने घरात घुसून वडिलांना शिवीगाळ केला आणि धमकी दिली. आत्यावर हल्ला केला ज्यामध्ये ती जखमी झाली. युवतीचा विनयभंग केला.

ही धक्कादायक घटना पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 9 सप्टेंबरच्या रात्री अचानक 27 वर्षांचा तरुण नग्नावस्थेत एका घरात जबरदस्तीने घसला. त्याने लज्जास्पद कृत्य केलं. ज्यामुळे कुटुंबातील लोकांना किळसवाणं वाटलं. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ केला आणि धमकी दिली.

कुटुंबातील व्यक्तींवर हल्ला केला आणि 17 वर्षांच्या युवतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दत्तावाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनय वाघमारे असं आरोपीचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली. विनय वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास दत्तावाडी पोलीस करत आहेत. या घटनेत युवतीची आत्या जखमी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *