राजकीय भूकंप ; काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ सप्टेंबर । Goa Congress Eight Mla Join Bjp : गोव्यात राजकीय भूकंप झाला झाला आहे. गोव्यात काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का आहे. मायकल लोबोंसह 8 आमदारांचा गटाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करणारे सर्व आठ आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दाखल झालेत. यामुळे आता गोवा काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसने देशात मोठ कॅम्पेयन सुरु केले असताना काँग्रेसला भाजपने दे धक्का दिला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ अभियानाची सुरुवात झाली आहे. त्यात आता काँग्रेसला एक धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे 8 आमदार भाजपात दाखल झाले आहेत. आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली आहे.

काँग्रेसमधून फुटलेले आमदार

1. विरोधी पक्षनेते आमदार मायकल लोबो
2. आमदार दिगंबर कामात
3. आमदार आलेक स्वीकवेरा
4. आमदार दिलाईबा लोबो
5. आमदार केदार नाईक
6. आमदार रुडॉल्फ फर्नाडिस
7. आमदार राजेश सरदेसाई
8. आमदार संकल्प अमोनकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *