कळंब:-अखेर एकनाथ लोमटे महाराजाला अटक,कळंब पोलिसांची दमदार कामगिरी,आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता??

Spread the love

Loading

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब:-याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब तालुक्यातील मलकापूर येथील स्वयंघोषित राष्ट्रसंत श्री एकनाथ लोमटे महाराजा विरोधात 28 जुलै 2022 रोजी परळी वैजनाथ येथील भक्त महिलेने गुंगीचे औषध देऊन विनयभंगाची केल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर लोमटे महाराजा विरोधात कळंब तालुक्यातील येरमाळा पोलिस ठाण्यातत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.तेंव्हापासून लोमटे महाराज फरार होता.

आज तब्बल सव्वा महिन्याच्या नंतर कळंब पोलिसांना एकनाथ महाराज यास अटक करण्यात यश आले आहे..

लोमटे महाराज यांची कारकीर्द ही चांगलीच वादळी ठरली आहे त्याच्यावर भोंदूगिरी,जादूटोणा,व फसवणुक करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

तर आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराज यांची ख्याती आहे मात्र आता पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या महाराजाकडून आणखी किती गुन्हे उलगडून घेण्यात यश येईल हे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *