सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या FDवर मिळणार जास्त व्याज ; चेक बँकेचे नवे दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ सप्टेंबर । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीही कर्जाचे व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँक ठेवींवरील (FD) व्याजदरही वाढू लागले आहेत. दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदर वाढवले ​​आहेत. बँकेचे नवीन व्याजदर 10 सप्टेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. बँक आता 60 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या FD वर अधिक व्याज देईल. बँकेतील 3 वर्ष ते 5 वर्षांपर्यंतच्या FD वरील व्याजदर 10 बेसिस पॉईंट्सने 5.50 टक्के करण्यात आले आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया आता 7 ते 14 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के व्याज देईल, तर बँक 15 ते 30 दिवसांच्या FD वर 2.90 टक्के व्याज देत राहील. 31 ते 45 दिवसांच्या एफडीवर बँक 3 टक्के, 46 ते 59 दिवसांच्या एफडीवर 3.35 टक्के, 60 ते 90 दिवसांच्या एफडीवर 15 बेस पॉइंटच्या वाढीसह 3.35 टक्क्यांऐवजी 3.50 टक्के बँकेकडून मिळेल. तर 91 ते 179 दिवसांच्या ठेवींवर 3.85 टक्क्यांऐवजी 4 टक्के व्याज दिले जाईल.

बँका आता 180 दिवस ते 270 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.65 टक्क्यांनी, 271 ते 364 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्क्यांनी, 1 वर्ष ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 10 बेस पॉईंट्स अधिक 5.45 टक्के, 2 वर्षांहून अधिक 3 वर्षांच्या FD वर 10 बेसिस पॉइंट्स अधिक 5.50% आणि 3 वर्षे ते 5 वर्षांच्या FD वर 10 बेसिस पॉइंट्सच्या वाढीसह 5.50 टक्के व्याज मिळेल. याशिवाय, बँक 5 वर्षे ते 10 वर्षे मुदत ठेवींवर 5.60 टक्के आणि 555 दिवसांच्या एफडीवर 5.55 टक्के व्याज देत राहील.

अलीकडेच आरबीआयने रेपो रेट 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला आहे. RBI ने मागील 3 पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, करुड वैश्य बँक, इंडसइंड बँक, ICICI बँक इत्यादींनी देखील काही दिवसांपूर्वीच त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *