महाराष्ट्र २४ ऑनलाईन – संजीवकुमार गायकवाड – विशेष प्रतिनिधी – उमरी नांदेड : गेल्या दिड महिन्यापासून कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देश लाॅकडाऊन आहे. वरील परिस्थितीत उमरी तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव असलेल्या तळेगावात ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, ग्रामसेवक, ग्रा प कर्मचारी, से. सह सोसायटीचे चेअरमेन, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अशा वर्कर यांनी गावात वेगवेळ्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून गावात जनजागृती करून कोरोना विरुद्ध काम सुरु केले आहे. गावात संपूर्णपणे सॅनिटायजेशन करण्याच्या दृष्टीने गावात डेटॉल, फिनाईल, ब्लिचिंग पावडरची फवारणी गावात करण्यात येत आहे. गावातील प्राथमिक आरोग्या विषयी कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ग्रा.पं कार्यालय दर ३ दिवसांत बैठक घेऊन बाहेर गाव वरून येणारे नागरिक व गावातील आरोग्य परिस्थितीचा आढावा सातत्याने घेतला जात आहे. गावात मोलमजुरी करणारे विधवा, गरोदर, अपंग, हलाकीच्या परिस्थितीच्या असलेल्या 100 कुटुंब धारकांना ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांकडून आवश्यक असलेले तांदूळ ,साखर,तेल,निरमा, साबणचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील लोकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 1500 मास्क ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक वार्डात वाटण्यात आले आहे. गावात जनजागृतीसाठी दररोज गावात ग्रामपंचायतला बसविलेल्या लाऊडस्पीकर वरून जनजागृतीचे काम सातत्याने केले जात आहे. गावात जलस्वराज्य-२ या योजनेचा शुद्ध पाणीपुरवठा असल्या कारणाने गेल्या दिड महिन्यापासून आरोग्याच्या सर्व्हेक्षणा अंती कोरोना पासून कोसोदूर असलेल्या ह्या तळेगावात एकही लक्षात घेण्यासारखे रुग्ण आढळून आले नाहि. अशा परिस्थितीत अहोरात्र काम करणाऱ्या गावातील 24 कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत च्या वतीने प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहनपर मानधन देऊन प्रोस्तहीत करण्यात आले*
*गावातील आरोग्य कर्मचारी- सौ छाया मनाळकर , सौ चंद्रकला उडतेवार, सलमा बेगम , विशाखा खंडेलोटे, अंगणवाडी कर्मचारी- सुरेखा पीराजी शिंदे, चंद्रा बाई गंगाराम पंदिलवाड, द्रौपदा प्रवीण खंडेलोटे, उषा उत्तमराव शिंदे, विनोदिनी व्यंकटराव लाटकर, गंगासागर मारोती आरटवार, श्रद्धा नरसिंग चना, संगीत गोटमुकले, विजया मुंडकर, पौर्णिमा हैबते व ग्रामपंचायत कर्मचारी – नागेश्वर गंधारे, शेख समीर, पांडुरंग पांडे, माधव खंडेलोटे, सुरेश पुपुलवाड, श्रीपती चरकेवाड , रमाबाई खंडेलोटे, संजय कवडीकर, खुशाल जाधव, ऋषिकेश जाधव अशा 24 जनांना प्रत्येकी एक हजार रुपये ग्रामपंचायतच्या 14 वे वित्त आयोग निधीतून प्रोत्साहन पर मानधन देण्यात आले. या प्रसंगी डॉ विक्रम देशमुख (पॅनल प्रमुख तथा सदस्य), आनंदराव यल्लमगोंडे (जि.प.सदस्या प्रतिनिधी) ग्रामविकास अधिकारी नारायण खानसोळे, तलाठी अशोक गंगासागर यांनी आपल्या मनोगातून गावातील आरोग्याविषयी काळजी घेण्याबाबद व गावातील शुद्ध पाणीपुरवठा व्यवस्थित करने बाहेर गावाहून येनारया व्यक्ती पासुन सतर्क रहाणे ई बाबद ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य सेविकांनी सतर्क रहावे या बाबद मार्ग दर्शन केले*
*तसेच या कार्यक्रम प्रसंगी तळेगाव येथील या महिन्यात निधन झालेले गावातील ज्येष्ठ नेते माजी सरपंच कै बाळासाहेब हरिश्चंद्रराव देशमुख , माजी उपसरपंच तथा सेवा स सो व्हाइस चेयरमन कै रामचंद्र ईरबाजी जाधव यांच्यासह कै संजय उप्पलवाड याना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम कै बाबासाहेब देशमुख गोरठेकर सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आला*.