महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – औरंगाबाद – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – कोरोनाने औरंगाबादेत थैमान घातले आहे. आतापर्यंत 177 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यात धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे शहरात आठवा बळी गेला आहे. गुरुदत्त नगर, गारखेडा येथील 47 वर्षीय रुग्णाचा घाटी रुग्णालयात दि. 1 मे सकाळी सहा वाजता मृत्यू झाला. हा रुग्ण व्यवसायाने वाहन चालक होता. त्याला 27 एप्रिल रोजी त्याला भरती करण्यात आले होते. सात दिवसापासून ताप, कोरडा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. कोविडची लक्षणे असल्याने त्याला कोविड संशयित कक्षात भरती करण्यात आले होते. त्याचा घेतलेला स्वब पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला पॉझिटिव्ह कक्षात हलवण्यात आले होते. त्याच्या एक्सरेनुसार दोन्ही बाजूला निमोनिया झाला होता. कक्षामध्ये त्याला कृत्रिम ऑक्सिजन वर ठेवण्यात आले होते. दुर्देवाने आज दि.1 मे रोजी सकाळी 6.20 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्याचा Pulmonary Embolism Secondary To COVID-19 Associated Coagulopathy With Bilateral Pneumonia With Acute Respiratory या कारणाने मृत्य झाला, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.