दुःखद: निधन ; ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ ऑक्टोबर । बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अरुण बाली यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण बाली हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. अरुण बाली हे मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होते. हा एक ऑटोइम्यून आजार आहे.

या चित्रपटांमध्ये दिसले
अरुण यांचा जन्म 1942 मध्ये लाहोरमध्ये झाला होता. 90 च्या दशकात त्यांनी करिअरला सुरुवात केली. अरुण यांनी राजू बन गया जेंटलमन, खलनायक, फूल और अंगारे, आ गले लग जा, पोलीस गुंडा, सबसे बडा खिलाडी, सत्य, हे राम, ओम जय जगदीश, लगे रहो मुन्ना भाई, बर्फी, एअरलिफ्ट, रेडी, बागी 2, केदारनाक या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लाल सिंग चड्ढा हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *