पुणे-अमरावती रेल्वे बंद; रेल्वेकडून नवीन वेळापत्रक लागू, जाणून घ्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ ऑक्टोबर । रेल्वे प्रशासनाने एक ऑक्‍टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू केले आहे. या वेळापत्रकानुसार पुणे विभागातून काही नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल केले आहेत. त्यात पुणे-अमरावती ही गाडी बंद करण्यात आली आहे.

पुणे विभागात नव्याने सुरू झालेल्या गाड्या

पुणे ते फलटण पॅसेंजर

पुणे ते जसिडिह (झारखंड)

पुणे स्टेशनपर्यंत वाढविलेली रेल्वे

पुणे ते नांदेड (पूर्वी – हडपसर ते नांदेड)

वारंवारिता वाढविलेल्या ट्रेन

पुणे ते नांदेड (आठवड्यातून तीन दिवस; पूर्वी आठवड्यातून एक दिवस)

वार बदललेल्या रेल्वे

पुणे ते लखनौ दर मंगळवारी (पूर्वी दर रविवारी)

हडपसर ते हैदराबाद दर मंगळवार, शुक्रवार, रविवार (पूर्वी सोमवार, बुधवार, शनिवार)

एक्‍स्प्रेस ते सुपरफास्ट बदल

अहमदाबाद-पुणे-अहमदाबाद

पुणे-नागपूर-पुणे

बंद केलेल्या रेल्वे

पुणे ते अमरावती

पुणे ते पनवेल पॅसेंजर

पुणे ते मनमाड

टर्मिनलमध्ये बदल

हडपसर ते हैदराबाद (पूर्वी पुणे)

कन्याकुमारी ते पुणे (पूर्वी मुंबई)

रेल्वेचे वेळापत्रक दीड वर्षानंतर नव्याने तयार करण्यात आले आहे. यात रद्द केलेल्या गाड्या पूर्वीच बंद केल्या आहेत. काही गाड्या पूर्वीच सुरू केल्या आहेत; पण वेळापत्रकात त्यांना जागा मिळाली नव्हती. ती आता देण्यात आली आहे.

– मनोज झंवर,

जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *