बीड : भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची गोळी झाडून आत्महत्या ; राजकीय वर्तुळात खळबळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑक्टोबर । बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियानी यांनी आज सकाळी गोळी झाडून आत्महत्या केलीय. त्यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला.बियानी यांच्या आत्महत्येचे कारण अजून समजले नसून, या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्याचे समजते.

भगीरथ बियाणी हे भाजपचे बीड शहराध्यक्ष होते. त्यांनी सकाळी आत्महत्या केली. गोळी झाडून घेत त्यांनी स्वतःला संपवले. मात्र, या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना शहरातील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

बियाणी यांच्या आत्महत्येची बातमी समजताच खासदार प्रीतम मुंडे यांनी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही रुग्णालयात पोहचले. या अचानक घडलेल्या घटनेने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांनी आत्महत्या का केली, याची चर्चा सुरू आहे. या मागे कौटुंबिक कारण की राजकीय अशी चर्चाही रंगली आहे.

कार्यकर्त्यांची गर्दी

सध्या बियाणी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. या ठिकाणी नातेवाईकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्यने गर्दी केली आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांनी धाव घेतली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *