महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑक्टोबर । निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव आणि धगधगती मशाल हे चिन्ह मिळाले. यानंतर आज शिंदेंनी सकाळीच इमेलद्वारे निवडणूक आयोगाला शंख, रिक्षा व तुतारी फुंकणारा माणूस हे 3 पर्याय पाठवले आहेत. या तिन्ही पर्यायांमधून शिंदेंना कोणते चिन्ह मिळते हे पहावे लागणार आहे.
दुसरीकडे, सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाने आयोगाकडे पिंपळाचे झाड, तळपता सूर्य व तलवार ढाल हे तीन चिन्ह मागितल्याचा दावा केला आहे. पण त्याची अद्याप पुष्टी झाली नाही.
निवडणूक आयोग काय म्हणाले?
दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचे चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे यांनी दिलेली तिन्ही चिन्हे निवडणूक आयोगाने नाकारली असून मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 3 नवे पर्याय देण्याचे आदेशही आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहेत.
उद्धव ठाकरेंना धगधगती मशाल
धगधगती मशालहे चिन्ह समता पार्टीकडे होते. मात्र, 2004 मध्ये पक्ष संपुष्टात आल्याने ठाकरे गटाला धगधगती मशाल चिन्ह देण्यात आले.
गदा : नाकारले धर्माशी निगडित असल्याने एकनाथ शिंदे गटाला गदा हे चिन्ह नाकारण्यात आले. ठाकरे गटानेही या चिन्हाचा पर्याय दिला होता.