महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑक्टोबर । सलमान मुल्ला । याबाबत सविस्तर माहिती अशी की बीड शहरातील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 11:30 च्या सुमारे उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात भगीरथ बियाणी यांच्या मिञ परिवार व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती जिल्हा रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मात्र आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे अद्याप कळू शकले नाही..
बियाणी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक सामाजिक कार्य केलेले आहेत.त्यांनी आज त्यांच्या राहत्या घरात गोळी झाडूनआत्महत्या केली..
घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात खासदार प्रितम मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांनी घटनास्थळी भेट दिली..