शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ‘मशाल’ वादाच्या भोवऱ्यात ?, या पक्षाने केला दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ ऑक्टोबर । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ‘मशाल’ (Mashal ) वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेत मोठी फूट पडल्याने पक्ष आणि पक्ष चिन्ह वाद उभा राहिला. ठाकरे गट आणि शिंदे गटात यावरुन दावे आणि प्रतिदावा करण्यात आला. हा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे दोन्हीही गोठवलं. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ‘मशाल’ हे नवीन चिन्ह दिलं. आता या चिन्हावरही दुसऱ्या पक्षाकडून दावा करण्यात येत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ‘मशाल’वर समता पार्टीने आक्षेप घेतला आहे. ठाकरेंची मशाल ही आमच्या पार्टीच्या चिन्हासारखीच दिसत असल्याचा दावा समता पार्टीने घेतला आहे. मतदान यंत्रावर ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये चिन्ह असते. त्यामुळे दोन्ही चिन्ह सारखीच दिसू शकतात, असा दावा समता पार्टीचा आहे.

याप्रकरणी ईमेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे चिन्हावर समता पार्टीने हक्क सांगितल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात 2004 मध्ये समता पार्टीची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत ठाकरे यांना धगधगती मशाल हे चिन्ह दिले आहे. दरम्यान, असं असलं तरी यामुळे ठाकरे यांची ‘मशाल’ पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *