Pune CNG : पुणेकरांच्या चिंतेत भर ! 1 नोव्हेंबरपासून पुण्यात सीएनजी नाही मिळणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ ऑक्टोबर । पुण्यात 1 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद (Pune CNG Pump on Strike) राहणार आहेत. पेट्रोल डिलर असोसिएशनच्या (Petrol Dealer Association) वतीने 1 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. या संपाचा फटका पुणेकरांच्या थेट जगवण्यावर जाणवण्याची शक्यता आहे. खरंतर येत्या 20 ऑक्टोबरपासूनच हा संप सुरु होणार होता. पण दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर हा संप 11 दिवसांनी पुढे ढकलण्यात आलाय. 1 नोव्हेंबर पासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आलाय.

विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जोपर्यंत जमा होत नाही, तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संपामुळे पुणेकरांचे हाल होण्याची दाट भीती आहे. सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीचं काय होणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जातोय. दरम्यान, त्याआधीच या संपावर तोडगा काढण्याचीही गरज व्यक्त केली जातेय.

शुक्रवारी पुण्यात टोरंट सीएनजी संपाच्या मुद्द्यावर बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश देशमुख, एचपीसी, आयओसी, बीपीसीएल आणि टोरेंट गॅसचे कार्यकारी संचालक तसंच पीडीए आणि जिल्हा पुरवठा अधिकाराही देखील हजर होते. या बैठकीत टोरंट सीएनजी पंप चालकांनी आपली मागणी लावून ठरली.

याआधी 1 ऑक्टोबर रोजी टोरंट सीएनजी पंप चालकांनी एक दिवसांचा लाक्षणिक बंद पुकारला होता. डीलर कमिशनमध्ये वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता.

1 ऑक्टोबर रोजी झालेल्या संपात 60 सीएनजी पंप चालक सहभागी झाले होते. या संपावेळी टोरंट सीएनजी पंप सोडले, तर इतर पेट्रोल पंप आणि एमएनजीएलकडून पुरवठा केला जाणारे सीएनजी पंप सुरु होते. त्यामुळे या बंदचा तितकाचा फटका पुणेकरांना जाणवला नव्हता. मात्र आता 1 नोव्हेंबर पासून पुकारण्यात आलेल्या संपाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच सीएनजी पंपचालकांच्या प्रलंबित मागण्या मान्य होतात, याकडेही पुणेकरांचं लक्ष लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *