डेंग्यूच्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष ; ताप मुलांसाठी ठरू शकतो घातक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ ऑक्टोबर । देशातील अनेक भागात सध्या डेंग्यू तापाचे (dengue fever) रुग्ण आढळत आहेत. या तापामुळे काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. बहुतांश रुग्णांचा डेंग्यूचा आजार (disease) घरीच बरा होत असला तरी या आजाराची काही लक्षणे आहेत, ज्यामुळे रुग्णांची (patients) प्रकृती गंभीर होऊ शकते. या ऋतूमध्ये डेंग्यूच्या कोणत्या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे ते डॉक्टरांकडून जाणून घेऊया.

बालरोगतज्ज्ञ डॉ. अरूण शाह यांच्या सांगण्यानुसार, डेंग्यूची अनेक प्रकरणे लहान मुलांमध्येही आढळून येत आहेत. साधारत: डेंग्यू झाल्यास ताप येणे, अंग दुखणे, थकवा येणे, सुस्ती वाटणे आणि उलट्या व जुलाब होणे, असा त्रास होतो. मात्र डेंग्यूच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन उपचार न केल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.

अशा प्रकरणांमध्ये डेंग्यू शॉक सिंड्रोम आणि डेंग्यू हेमरेजिक ताप येऊ शकतो. डेंग्यूची सौम्य असतील तर ती 3 ते 7 दिवसांत संपू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, लहान मुलांना हा आजार झाला तरी ती घरीच बरी होतात. पण डेंग्यूची लक्षणेही गंभीर असतात.हा आजार झाल्यास शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. शरीरातील प्लेटलेट्स 20 हजारांच्या खाली गेल्यास परिस्थिती धोकादायक बनते.

ही आहेत गंभीर लक्षणे
डेंग्यूची गंभीर लक्षणे दिसू लागल्यास रुग्णाच्या त्वचेवर लाल रंगाचे पुरळ येऊ लागते. तसेच अनेक भागांतून रक्तस्त्राव सुरू होतो आणि त्यामुळे हृदय, फुफ्फुस आणि किडनी यांचे नुकसानही होऊ शकते. अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाचे ब्लड प्रेशर देखील खूप कमी होते. यामुळे डेंग्यू शॉक सिंड्रोम होऊ शकतो.

ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीला आधीच कोणताही आजार झाला असेल आणि त्याच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल, तर डेंग्यूची ही गंभीर लक्षणे त्या व्यक्तीसाठी प्राणघातक ठरू शकतात.

ज्या लोकांना यापूर्वीही डेंग्यू झाला आहे त्यांना पुन्हा या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका असतो. बर्‍याच रुग्णांमध्ये, डेंग्यूचा एखादा दुसरा स्ट्रेन संसर्ग पसरवू शकतो. त्यानंतर संसर्ग झालेल्या व्यक्तीला इतर स्ट्रेनचाही त्रास होऊ शकतो. गेल्या वर्षी राजधानी दिल्लीमध्ये डेंग्यूच्या अनेक रुग्णांमध्ये डी2 हा स्ट्रेन आढळून आला, जो अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध झाले.

डेंग्यूपासून असा करा बचाव

– लहान मुलांना पूर्ण हातांचे कपडे घालावे.

– घरात व आसपासच्या परिसरात स्वच्छता ठेवावी व कोठेही पाणी जमा साठू देऊ नये.

– रात्री झोपताना म्चछरदाणीचा वापर करावा.

– लहान मुलांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *